आपला जिल्हा

अरे व्वा.‌.. 42 पैकी 35 निगेटिव्ह सात प्रलंबित

बीडचार दिवसापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम बसला असून जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या बेचाळीस स्वॅब पैकी 35 अहवाल निगेटिव आले आहेत तर उर्वरित 7 अहवाल प्रलंबित आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्या युवकाचा अहवाल येणे बाकी आहे.
शुक्रवारचा दिवस बीड जिल्हा वासियांसाठी दिलासादायक गेला.
42 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते‌. त्यापैकी 35 अहवाल आले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. गुरुवारी दुपारी प्रलंबित असणारे 13 अहवाल पॉझिटिव आल्यामुळे हादरा बसला होता.आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 15 ,बीड 5, केज 2 , पाटोदा 3 , गेवराई 2, धारूर एक वडवणी एक अशी रुग्ण संख्या आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 37 वर जाऊन पोहोचलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close