क्राईम

धारुर शहरात पंकज कुमावत यांच्या पथकाची अवैध धंद्यावर कारवाई. Action by Pankaj Kumawat’s team against illegal business in Dharur city

धारूर — शहरात पंकज कुमावत यांच्या पथकाने अवैध धंद्यावर कारवाई बडगा उगारला आहे . शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी पथकाने थेट कारवाई करुन आठ आरोपीना बेड्या घालून लाखोंचा ऐवज जप्त केला अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरु आहे . माजलगाव , परळी , केजनंतर कुमावत यांच्या पथकाने धारूर पोलिस ठाणे हद्दीत अवैध गुटखा विक्री करणारा , अवैध मटका , सोरट जुगार खेळणाऱ्या ठिकाणी छापेमारी केली . यात मटका घेणारा एक इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराची साहित्य नगदी व मोबाईलसह 11 हजार 680 रुपयाचा माल जप्त केला . सोरठ खेळणाऱ्या दोन इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी 1340 रुपये सोरठ जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले . यासोबत गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली . गुटखा विक्री करताना एक इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटख्याचा माल व स्विफ्ट कार असा 3 लाख 76000 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला . गुटख्याच्या गुन्ह्यात 4 आरोपी विरूद्ध व जुगाराच्या दोन गुन्ह्यात 4 आरोपी विरुध्द शुक्रवारी रात्री धारुर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button