आपला जिल्हा

जिल्हयातील सर्व बँका २३ मे रोजी सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड —  जिल्हयातील सर्व बँका दिनांक २३ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. सुट्टींच्या कारणामुळे बाधा येवू न देता या बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात विषम दिनांकास संचारबंदीतुन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत शिथिलता देण्यात आलेली आहे . केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार दिनांक २३ में २०२० रोजी चौथा शनिवार निमित्त सुट्टी असून या विषम दिनांकास बैंका बंद राहिल्यामूळे सदर परिस्थितीच्या कालावधीत लोकांना आर्थिक व्यवहार करणेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सदर आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपती यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत .यामुळे या आदेशासह यापूर्वीचे आदेश, सुधारीत आदेश , सुधारणा आदेश अमंलात राहतील असे निर्देशीत केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close