क्रीडा व मनोरंजन

परळीत रविवारी आदर्श शिंदेंच्या कडक आवाजात भीमगीतांची रंगणार सुरेल मैफल. A melodious concert of Bhim Geet will be held in the strong voice of Adarsh ​​Shinde in Parli Sunday

नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात रविवारी आदर्श शिंदेंच्या कडक आवाजाने भरणार रंग

परळी — आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदेशाहीचा वारसा, आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम रविवारी (दि. 04) सायंकाळी शहरातील मोंढा मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.

नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात दररोज एकापेक्षा एक कार्यक्रम सादर केले जात असून, आजपर्यंत मराठी सिनेतारकांचा स्टेज शो, कोमलताई पाटोळे यांचा देवीचे भजन व जागरण गोंधळ तसेच साबरी ब्रदर्स यांचा सामाजिक एकतेचा संदेश देणारा कव्वाली मुकाबला असे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. तर आज अजय अतुल यांच्या परळी आगमनाने स्थानकांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळत आहे.

रविवारी सायंकाळी 7 वा. प्रसिद्ध गायक, शिंदेशाहीचा वारसा, आदर्श शिंदे यांच्या कडक आवाजात भीम गीतांची मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button