बीड शहरातील दोन मेडिकल चालकांविरोधात गुन्हा दाखल A case has been registered against two medical drivers in Beed city

बीड — डॉक्टरांची चिठ्ठी नसताना अनाधिकृतपणे औषध विक्री करणार्या दोन औषधी दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जी औषधे मेडिकलवाल्यांनी विकली त्या औषधाचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
बीड शहरातील कारंजा टॉवर येथील न्यू विहान या मेडिकलवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. या मेडिकलवाल्याने गेल्या काही महिन्यात विविध औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री केल्याचे समोर आले. जी औषधी विकण्यात आली त्याचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक विलास विश्वनाथ दुसाणे यांच्या फिर्यादीवरून शेख सईद शेख मझहर व सारंग अनिल धोंगडे या दोघांविरोधात कलम 328, 276, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.