क्राईम
विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन मुलांचा मृत्यू.Two children along with their mother died after being hit by an electric wire

गेवराई — तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील आई व दोन मुलांचा विजेच्या तारेला चिटकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गौरी आगमनाच्या दिवशी आज दि.3 सप्टेंबर रोजी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ललीता श्रीकांत राठोड वय 30 वर्ष रा. भेंडटाकळी तांडा, ता.गेवराई, तसेच त्यांची दोन मुलं प्रशांत श्रीकांत राठोड वय 11 वर्ष व अभिजीत श्रीकांत राठोड वय ८ वर्ष या तिघांचा घराजवळील तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. गौरी आगमनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.