आपला जिल्हा

भाजपाचे आ. रमेश कराड शालीनी कराड यांच्यासह 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

परळीभाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य रमेश कराड यांनी गोपीनाथ गडावर जाऊन आज सकाळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे कुठलेही पालन न करता जमाव जमवल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कराड यांच्यासह 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. पोलीस प्रशासनात कुठलीही पूर्वकल्पना न देता नवनिर्वाचित आ. रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे कार्यकर्त्यांसह मोठा जमाव जमवत स्व. गोपीनाथ मुंडे समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.शालीनी कराड जीवराज ढाकणे श्रीहरी मुंडे डॉ. बालासाहेब कराड, दिनकर मुंडे यांच्यासह दहा ते पंधरा लोक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी, प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पालन करण्यात आले नाही. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क हॅन्ड ग्लोज यांचा कुठेही वापर करण्यात आला नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तीन तेरा वाजवले. याप्रकरणी पोलीस नाईक घुगे यांच्या फिर्यादीवरून 22 जणांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 143, 188 ,269 ,270 ,271 भादवि सह कलम 51 ( ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि शहाणे हे करत आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close