क्रीडा व मनोरंजन

धनुभाऊंनी माझ्यासारख्या ग्रामीण लोककलाकाराला मोठ्या सेलिब्रेटींच्या व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी दिली – कोमलताई पाटोळे. Dhanubhau gave a rural folk artist like me an opportunity to present art on the platform of big celebrities – Komaltai Patole

नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात दुसऱ्या दिवशी कोमलताई पाटोळे यांनी जागरण गोंधळ व मराठी लोककला केली सादर

तुळजाभवानी, श्री खंडेराया, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह लोकनेते गोपीनाथ मुंडेंना सुरेल गीतांमधून वंदना

परळी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची आरती

परळी — धनंजय मुंडे साहेब हे इथल्या गोरगरीब जनतेचा प्राण असून, नाथ प्रतिष्ठान मार्फत आयोजित गणेशोत्सवात दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले कलाकार व सेलिब्रेटी ज्या मंचावर आपली कला सादर करतात, त्या मंचावर माझ्यासारख्या ग्रामीण भागातील छोट्या कलाकाराला धनुभाऊंनी आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे यांनी परळी येथील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान द्वारे आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोमलताई पाटोळे यांच्या समूहाचा जागरण गोंधळ, भजन, भक्तिगीते, लोकगीते, भारुड आदींच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास परळी व परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

आई तुळजाभवानी, श्री खंडेराया, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोमलताई व त्यांच्या समूहाने सुरेल गीतांमधून वंदना केली. त्याचबरोबर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना ‘मुंडे साहेब होते गरिबांचा वाली…’ या सुंदर गीताच्या माध्यमातून वंदना केली.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी परळी येथील तीनही पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सुरेश चाटे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, लक्ष्मण तात्या पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नितीन मामा कुलकर्णी, राजेंद्र सोनी, अनंत इंगळे, शंकर कापसे, प्रणव परळीकर यांसह आदी उपस्थित होते.

आरतीनंतर कोमलताई पाटोळे यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, पो.नि. सुरेश चाटे, सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे, स.पो.नि. चंद्रकांत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, करण पाटोळे, डी जी मस्के, रमेश मस्के, नरसिंह गायकवाड, नवनाथ जोगदंड, के डी उपाडे, बालाजी मस्के, भागवत मस्के, भारत ताटे, मुन्ना मस्के, बालाजी मस्के यांसह नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य परळीकरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत इंगळे व महेश मुंडे यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button