महाराष्ट्र

उद्यापासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू होणार

मुंबईलॉक डाऊन 4 मध्ये रेड झोन व कंटेनमेंट घेऊन वगळता राज्यातील उर्वरित भागात काही अधीन राहून बावीस मेपासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून जीवनवाहिनी असलेली बस सेवा सुरू होत आहे.
लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात राज्य शासनाने रेडझोन व कंटेनमेंट घेऊन वगळता काही अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 23 मार्च पासून मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता बससेवा पूर्णपणे महाराष्ट्रात बंद आहे. जिल्ह्यातील ठराविक मार्गावर उद्यापासून बस सेवा सुरू होत आहे असे असले तरी काही नियम सुद्धा यासाठी लावण्यात आले आहेत
जिल्हा-अंतर्गत सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत ही बस सेवा सुरू राहील,प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील ,सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 %प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल, जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना  सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे, प्रवासामध्ये प्रत्येक  प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे या अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री, अॅड. अनिल परब यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात याप्रमाणे सुरू होईल बससेवा

बीड ते परळी,  बीड ते अंबाजोगाई , बीड ते माजलगाव, बीड ते धारूर, बीड ते गेवराई, बीड ते पाटोदा, बीड ते आष्टी ,परळी ते अंबाजोगाई ,धारूर ते अंबाजोगाई,  केज ते माजलगाव, माजलगाव ते गेवराई गढी याप्रमाणे या बसच्या 12 फेऱ्या होणार आहेत.सदरील बसेस सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रति 1 तासाने सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी  प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close