आरोग्य व शिक्षण

वटवृक्षांची ‘कटींग ‘आणि करंजाच्या खुरट्या झुडपांची’ सेटींग ‘करत शासनाची दिशाभूल ;धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार Govt misguided by ‘cutting’ of banyan trees and ‘setting’ of stunted karanja bushes; incident on Dhule-Solapur National Highway

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात ४०-५० वर्षापुर्वीच्या वटवृक्ष,पिंपळ,कडुनिंब आदि हजारो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. बीड ते मांजरसुंभा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मात्र फक्त करंज जातीच्या खुरट्या रोपांची लागवड करत शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळेच पर्जन्यमान कमी होणार जैवविविधतेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून कंत्राटदारांना मात्र याचे सोयरे सुतक नाही.

वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमींनी तक्रारी नंतर टोलवाटोलवी;ठोस निर्णय नाही
वृक्षप्रेमी तसेच पर्यावरण प्रेमींनी वारंवार केंद्र तसेच राज्य शासनाला निवेदन,आंदोलनाद्वारे तक्रार केल्यानंतर संबधित विभागाच्या वनविभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले असून त्यांचे आधिकारक्षेत्र असल्याचे कळवले जाते. मात्र कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत.

वड,पिंपळ,कडुनिंब आदि स्वदेशी झाडे लावण्याची नितिन गडकरी यांना मागणी –डाॅ.गणेश ढवळे
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वड,पिंपळ,कडुनिंब आदि. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात करंजा सारखी खुरटी झुडपे लावण्यात आली असून त्याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वदेशी झाडांची लागवड करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबाद प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य आणि बीड तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती शेख युनुस च-हाटकर यांनी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

मांजरसुंभा-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर कागदोपत्रीच वृक्षलागवड ;उन्हाळ्यात टॅकर पाण्याचे बिल मात्र नियमित निघते

अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते अंबाजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीने केवळ कागदोपत्रीच वृक्षलागवड केली असून काही वर्षापुर्वी वृक्षलागवड केल्याचे नाटक करत थातूरमातूर फोटोसेशन पुरती वृक्षलागवड केली परंतु त्याचे संगोपन करण्यात आले नसुन सध्या एकही झाडं आस्तित्वात दिसत नसतानाही वृक्षलागवड-वृक्षसंगोपण आणि उन्हाळ्यात टॅकरने पाणी दिल्याचे बिले मात्र नियमित उचलली जात आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button