क्रीडा व मनोरंजन

सोनाली कुलकर्णीच्या रखुमाई गीताने परळीकरांची जिंकली मने; प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात वैद्यनाथ गणेशोत्सवाचे प्रथम पुष्प.Sonali Kulkarni’s Rakhumai song won hearts of Parlikars; The first flowers of Vaidyanath Ganeshotsav in response to the overwhelming response of the audience

सोनालीसह मराठी सिनेतारकांच्या एकापेक्षा एक कलाकृतींनी बहरला सांस्कृतिक कार्यक्रम

शुक्रवारी साबरी ब्रदर्सच्या कव्वालीचा रंगणार मुकाबला

परळी — पोश्टर गर्ल या गाजलेल्या चित्रपटातील ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना, एकल्या विठुरायाला संसार पेलना…… रखुमाई…रखुमाई….’ या वर्णन गीतावरील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सादर केलेल्या उत्कृष्ट कलाकृतीने परळीकरांची मने जिंकली.

आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात मराठी सिनेतारका व रंगमंच कलाकारांचा कलाविष्कार पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली, त्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, प्राजक्ता गायकवाड, वैशाली जाधव, पूनम कुडाळकर, तेजा देवकर, सीमा पुणेकर आदी कलाकारांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री व टीव्ही निवेदिका स्पृहा जोशी यांनी केले.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 7 वा. सुप्रसिद्ध कव्वाली गायक साबरी ब्रदर्स व छोटी शबनम यांचा खास कव्वाली मुकाबला होणार असून, या मुकाबल्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button