अल्पवयीन मुलींवर अत्याचार ;गेवराई पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. Abuse of minor girls; case registered against two in Gevrai police

गेवराई — शहरात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तोंडाला रुमाल बाधून बळजबरीने बीडला नेऊन तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली असून संबधित आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत सविस्त माहिती अशी की , रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहाण असे या दोन अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. पिडीत अल्पवयीन मुलगी ही मुळ अंबड तालुक्यातील आहे तसेच नागझरी या ठिकाणी तीचे आई वडिल शेतात सालाने कामकाज करतात तसेच दि २९ रोजी सदरील पिडीता, तिच्या चुलती सोबत गेवराईला कपडे खरेदी करण्यासाठी आली होती. याच वेळी आरोपी ने पिडीतेच्या तोंडाला रुमाल बांधून बळजबरीने बीडला घेऊन गेले व एका कॉफीशॉपमध्ये नेऊन तिच्या ईच्छेविरूद्ध तिनवेळा बलात्कार केला असल्याची तक्रार पिडीतेने गेवराई पोलिसांत तक्रार दिली असुन दोन आरोपी विरूद्ध बालसंरक्षण कायदा , लैंगिक अत्याचार , अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी स्वप्निल राठोड करत आहेत.