आपला जिल्हा

वडवणी, पाटोदा, वहाली चिखली येथे सापडले कोरोनाचे चार रुग्ण

बीड — कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसून येत आहे. बुधवारी 113 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यासाठी पाठवण्यात आले त्यापैकी 90 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 4 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप सहा व्यक्तींचे अहवाल संदिग्ध (Inconclusive) आले तर 13 अहवाल प्रलंबित आहे.
बरेच दिवस कोरोना ने जिल्ह्यात शिरकाव केला होता मात्र शिरकाव करतात तीन दिवसात रूग्ण संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. बुधवारी पाठवण्यात आलेल्या स्वॅब चे अहवाल प्राप्त झाले असून जिल्ह्यात चार कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे

पाटोदा-1,तर वहाली चिखली -2 तील रुग्ण सापडले आहे. बीडची एकूण रुग्ण संख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे. एक रुग्ण कोरोना मुक्त झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. सहा रुग्णांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close