आरोग्य व शिक्षण

गेवराई उपजिल्हा रुग्णालय परीसरात हर्बल गार्डनचे आ.पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन Herbal Garden was inaugurated by mla Pawar in Gevrai Upazila Hospital premises

गेवराई —  येथील उपजिल्हा रुग्णालयात येथे हर्बल गार्डन व हर्बल वनस्पती लागवड उपक्रमाचे उद्घाटन सोमवार ता. 29 रोजी सकाळी अकरा वाजता आ.लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे परिसरातील मोकळ्या जागेत हर्बल गार्डन व आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्याची संकल्पना उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.एम.एच चिंचोळे यांनी राबवून परिसरात हर्बल गार्डनच्या माध्यमातून आकर्षक व विविध प्रकारची आयुर्वेदिक वृक्ष लागवड उपक्रम सुरू केला असून आ.लक्ष्मण पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करत या हर्बल गार्डनचे उद्घाटन दि.29 ऑगस्ट रोजी संपन्न झाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, वैद्यकिय अधीक्षक डॉ. चिचोळे, डॉ. राजेश शिंदे, डॉ.आंधळे, डॉ.रौफ, डॉ. रादंड , डॉ. पारखे डॉ.शेख यांच्यासह नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, प्रा.येळापुरे, पत्रकार सुभाष सुतार, भागवत जाधव, गोपाल चव्हाण, मंगेश खरात व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button