महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपकडून विशेष प्रयत्न

मुंबई —   महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बातमी ट्विट केली आहे. The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra? असे या बातमीचे शीर्षक आहे.

यावर आपले मत मांडताना सुब्रमण्यम स्वामी यांनी असे म्हटले आहे कि, “आताच योग्य वेळ आहे पुढे तशी वेळ येणार नाही. उद्धव ठाकरे आताच आघाडी तोडा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करून टाकतील.” दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्या ‘या’ ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपच्या केंद्रातील नेत्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत उघडपणे मत व्यक्त केल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपचे नेते आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून वारंवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी महाराष्ट्र भाजपसह आता केंद्रही विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close