क्राईम

हजारेंच्या पथकाने गुटख्याचा पिकअप पकडला; अशोक सक्रातेही जाळ्यात सापडला Gutkha’s pickup was caught by the special team; Ashok Sakrate was also caught in the trap

बीड — पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी अवैध धंद्यांचं कंबरड मोडण्याचा धडाका लावला आहे. पेठ बीड परिसरात नऊ लाखाचा गुटखा पकडल्यानंतर आज माजलगाव मध्ये पाच लाख रुपये किमतीचा 21 पोते गुटखा जप्त केला आहे. सोबतच गुटखा माफिया अशोक सक्राते यास पकडले आहे.
माजलगाव जवळील परभणी फाट्यावरून पिक अप मधून गुटखा तस्करी केली जाणार असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून पासिंग नंबर नसलेल्या पिकप ला पकडले. तपासणी केली असता या पिक अप मध्ये 21 पोते गुटखा आढळून आला. पिक अप चा चालक किशोर शिंदे यास पोलिसांनी चौकशी केली असता हा गुटखा अशोक सक्राते या गुटखा माफीयाचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अशोक सक्राते यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या गोदामाची झाडाझडती सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे सपोनी विलास हजारे, शिवदास घोलप, विकास काकडे, विनायक कडू, किशोर गोरे, बालाजी बास्तेवाड, गणपत पवार आदींनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button