क्राईम

मांजरसुंबा घाटात टँकर पलटी होऊन पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू तर एक जखमी

बीडआज सकाळी इंधन घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन आग लागल्याची घटना मांजरसुंबा घाटात घडली. काही क्षणातच टँकरला लागलेल्या आगीने विक्राळ रूप धारण केले त्यामुळे घाट परिसरात धुराचे लोट पसरलेली दिसून येत होते. या दुर्घटनेत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर आणि एक जण जखमी आहे.


मांजरसुंबा घाटात सोलापूर हुन बीड कडे जात असलेला
इंधनाच टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकर मध्ये असलेल्या इंधनाने पेट घेत विक्राळ रूप धारण केले. टँकर पलटी होत असतानाच टँकर मध्ये असलेल्या एका इसमाने बाहेर उडी मारली यात तो जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर टँकर चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव व जखमीचे नाव मात्र समजू शकले नाही
यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close