आपला जिल्हा

केज तालूक्यातील 9 गाव कंटेनमेंट झोन तर 18 गाव बफर झोन म्हणून घोषित

बीडकेज तालुक्यातील केळगाव व चंदन सावरगाव मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे 27 गाव कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

मंगळवारी अहवालात केज तालुक्यातील चंदन सावरगाव व केळगाव येथे प्रत्येकी एक कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले. या रोगाचे संक्रमण होऊ नये यासाठी चंदन सावरगाव ,भाटुंबा ,केकत सारणी ,कुंबेफळ ,बन कारंजा ही पाच गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत तर आनंदगाव सारणी, सारणी आनंदगाव, जवळ बन, ढाफेफळ, जानेगाव, होळ, कळंब अंबा, मानेवाडी, उंद्री ही नऊ गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
केळगाव सह तीन किलोमीटर परिसरातील केळगाव, बेलगाव, अरणगाव, सांगवी ही चार गाव कंटेनमेंट झोन (Containment zone) म्हणूध घोषित करण्यात आले आहे .
तसेच त्या पुढील ०४ कि.मी.परिसरातील हनुमंत प्रिंपी, माळेवाडी, एकुरका, मस्साजोग, जाधवजवळा, काळेगांवघाट, सारणी , पिंपळगांव व कोरेगांव हि नऊ गाव बफर झोन (Buffer zone) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.हि सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close