आरोग्य व शिक्षण

नसलेल्या मिशीला जिल्हाधिकारी पिळ मारणार ,सरकारी कर्मचारी पगार , विमा कवच घेणार अन् दक्षता कमिटी पाणक्याच काम करणार,

बीडप्रत्येक गावात ग्रामसेवक ,तलाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक सरकारची यंत्रणा काम करते त्याचा मोबदलाही भरपूर घेते सरकारने आता त्यांना विमा संरक्षणही दिले आहे. कोविड योद्धे,देव म्हणून सन्मानही त्यांना दिला जाणार ते ते गुलगुले खाणार पण मुंबईहून विना परवाना आलेल्या लोकांना होम कोरंटाईन केल्यानंतर त्यांच्या घरी पाणी मात्र दक्षता कमिटी भरणार असा अजब लॉजिक जिल्हाधिकाऱ्यांनी मांडल आहे. ही तर प्रशासनावरची संपली असल्याचे  प्रतिक आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार खासदार या प्रश्नाकडे गांभीर्याने कधी पाहणार 4-2 लोकांमुळे सगळ्या गावाचं आरोग्य धोक्यात येत असताना हे बघ्याची भूमिका घेणार का ? अशा संकटाच्या काळात खेड्यातील लोकांना वाऱ्यावर सोडण्यासाठी आपल्याला निवडून दिले आहे काय ? पालकमंत्री म्हणून अशा संकटाच्या काळात धनु भाऊ तुम्ही खंबीर भूमिका घेण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे ही अपेक्षा फोल ठरू देऊ नका.

मुंबईहून आलेल्या लोकांमुळे गावचे आरोग्य धोक्यात आली आहे रोज आलेल्या पाहुण्या मुळे कोरोना बाधितांच्या आकडा वाढत आहे. या आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी गाव पातळीवर दक्षता कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बाहेरून आलेल्या लोकांना होम कोरंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना एखाद्या गावाने अशा लोकांना संस्थात्मक कोरंटाईन केले व त्याकडे गावाने लक्ष दिले तर काय हरकत आहे. गावाचे आरोग्य चांगले राहील बाहेरुन आलेली मंडळी एका जागी राहिली तर त्यांची सोय करणे सोपे जाईल असा प्रश्न विचारला असता रेखावार यांनी तुघलकी उत्तर देत. दक्षता कमिटीने होमकोरंटाईन करून प्रत्येकाच्या घरी पाण्याची त्यांच्या खाण्याची सोय करायची आहे असे सांगितले. दुष्काळी परिस्थिती असताना या ग्राम दक्षता कमिटीने पाणक्याचेच काम करत बसायचे, शिवाय चुकून कोरंटाईन केलेली व्यक्ती बाहेर आली तर गुन्हे सुद्धा या ग्राम दक्षता कमिटीवर, सरपंचावर प्रशासन दाखल करणार. अहो जिल्हाधिकारी साहेब प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, गिरदावर, शिक्षक ही गलेलठ्ठ पगार घेणारी तर ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी अशी सरकारी यंत्रणा सरकारचा पगार घेत काम करत आहे ? ते कोविड योद्धे म्हणून सरकार त्यांचा गौरव करत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी भरघोस रकमेचे विमा संरक्षण दिले जात आहे. मग या लोकांनी अशा संकटाच्या काळात नूसती बघ्याची भूमिका घ्यायची ?. अन् ” फुकटचा मोठेपणा त्यात काही भेटेना ” अशी अवस्था ग्राम दक्षता कमिटीच्या लोकांची झाली आहे. शिवाय या दक्षता कमिटीकडून हलगर्जीपणा झालाच तर गुन्हा सुद्धा यांच्यावरच दाखल केला जाणार. गावातील लोकांच्या दुश्मनी सुद्धा यांनीच घ्यायची. गाव वाचवायचा तर गावाने काळजी घ्यायची नोकरदार पांढरपेशा यांनी गुलगुले खायचे, ग्राम दक्षता कमिटीने जीव धोक्यात घालून काम करायचं, आणि यातून जे चांगले निष्पन्न होईल त्याचं श्रेय घेत “नसलेल्या मिशीवर “जिल्हाधिकाऱ्यांनी पिळ द्यायचा ‌ यावर विचार केला जाणार आहे का ? 4 –2 लोकांमुळे अनेकांचे प्राण संकटातच टाकले जाणार आहे काय ? प्रशासकीय यंत्रणा प्रत्येक अधिकारी आपला दोष खालच्या लोकांवर कसा ढकलता येईल यासाठी प्रयत्नशील आहे काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close