आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आणखी आठ नवे रुग्ण सापडले

 बीड — जिल्हयातील 66 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

 बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 19 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र पाटण सांगवी येथे सापडलेल्या रुग्णांपैकी एक महिला उपचारादरम्यान मृत पावली. तर तिचे नातेवाईक असलेले सहाजण पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णांची संख्या बारा वर जाऊन पोहोचली आहे. एकदम आठ आढळून आल्या मूळे बीड करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. बीड, गेवराई तालुक्यातील ईटकुर तसेच केज तालुक्यातील चंदन सावरगाव, केळगाव येथील हे रुग्ण आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close