महाराष्ट्र

जनतेनेच आता होमिओपॅथीला राजाश्रय मिळवून द्यावा :डॉ अरुण भस्मे

बीड    होमिओपॅथीचे महत्व आता जनतेला पटू लागले आहे त्यामुळे या पॅथीला जनतेनेच राजाश्रय मिळवून द्यावा असे आवाहन डॉ अरुण भस्मे यांनी केले,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीचे महत्व लोकाना पटले आहे,
या पॅथीला राजाश्रय मिळण्यासाठी माझ्यासारख्या अनेक होमिओपॅथी डाक्टरांनी व संघटनानी शासन दरबारी अनेकवेळा प्रयत्न केले परंतु इतर पॅथीच्या संघटनेने सरकारवर दबाव टाकून या पॅथीला राजाश्रयापासून वंचित ठेवले,
तसेच ही पॅथी ज्याच्या संचालनालयाखाली येते तेथे सर्व आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे त्यांनीही या पॅथीला पुढे येण्यापासून रोखले असा आरोपही डॉ भस्मे यांनी केला,
आम्ही यासाठी राजाश्रय मिळण्यासाठी जंग जंग पछाडले,वेळप्रसंगी मोर्चे उपोषणे केलीत मी तर 12 दिवस आमरण उपोषण केले होते, आमच्या 8 प्रमुख मागाण्यांपैकी फक्त अलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठीची मागणी शासनाने मान्य केली
आम्ही माजी खासदार स्व केशरबाई क्षीरसागर व माजी मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर यांचे माध्यमातूनही प्रयत्न केले होते,
होमिओपॅथीचे अनेक चमत्कार सरकार मधील लोकांना माहीत आहेत परंतु राजाश्रय देण्यासाठी त्यांचे प्रयत्न कमी पडतातअसेच म्हणावे लागेल
स्व बाळासाहेब ठाकरे यांनाही भेटून मी विनंती केली होती,
त्यांनी माझे निवेदन त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे पाठवले होते,आता महाविकास आघाडी सरकारने होमिओपॅथीला राजाश्रय मिळवून द्यावा असे आवाहनही डॉ भस्मे यांनी पाठविलेल्या निवेदनात केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close