आरोग्य व शिक्षण

बीड: आज पुन्हा मुंबईहून आलेले दोन जण कोरोना बाधित निघाले

बीड— आज बीड जिल्ह्यातून 77 संशयितांचे अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवले होते त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयात आता एकूण चार रुग्णावर उपचार सुरू आहेत ‌ आष्टीचे सहा रुग्ण पुणे येथे पाठवण्यात आले तर एक महिलेचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबई येथून आलेले आहेत.

मुंबई पुणे येथून बीड जिल्ह्यात येणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी एकही रुग्ण संख्या नसलेला बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भाग असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रविवारी आष्टी तालुक्यात एकाच कुटुंबातील सात रुग्ण आढळले होते . त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सहा रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आज पुन्हा दोन रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या आता चार वर पोहोचली आहे.
आज सोमवार दि. 18 मे रोजी सापडलेले दोन रुग्ण मुंबईच्या कांदिवली येथून आले होते.माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथे हे दोघे जण ११ मे रोजी आले . रविवारी त्यांना लक्षणे जाणवताच रुग्णालयात आणून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यांचे स्वॅब घेतले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close