आपला जिल्हा

कोरोना बाधित महिलेवर प्रशासन करणार अंत्यसंस्कार

बीडआष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे सुनेच्या माहेरी आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नसल्यामुळे बीडच्या भगवानबाबा प्रतिष्ठान लगत असलेल्या स्मशानभूमीत नगरपालिका व आरोग्य विभागाच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कुटुंबीय मुंबई येथे स्थायिक झाले होते कोरोनाच्या भीतीने आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे सुनेच्या माहेरी येऊन राहिले मात्र कोरोनाने पाठ सोडलीच नाही. भीती होती तीच गोष्ट घडली व या कुटुंबातील सातही जण कोरोना बाधित आढळून आले. यातील एका 65 वर्षीय महिलेचा पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या घरातली माणसं ही कोरोना बाधित आढळून आल्यामुळे त्यांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येणार नाही. महिलेवर प्रशासनच अंत्यसंस्कार करणार असून बीड नगर परिषदेकडून या संबंधीची पुर्वतयारी करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी दिली. या महिलेवर बीडच्या भगवानबाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close