मुंबई — पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुभाष भानुदास देशमुख वय – 55 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव असून ते उस्मानाबादचेअसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदळवाडी येथील शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, सदर शेतकऱ्याने कौटुंबिक वादामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पेट्रोलिंग वाहनातील पोलिसांनी शेतकऱ्यास तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याने शेतकरी 20 ते 30 टक्के भाजल्याची माहिती मिळत आहे.