आपला जिल्हा

5 गाव कंटेनमेंट झोन म्हणून तर 8 गाव बफर झोन म्हणून घोषित

बीड —  आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेले ७ रुग्ण आढळुन आले आहे. बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार या गावापासून३ कि.मी. परिसरातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावापासून ३ कि.मी. परिसरातील ( सांगवी पाटण, खिळद, पाटन, कोहीनी, कारखेलतांडा ) हा परिसर कन्टेनमेंट Containment zone म्हणून घोषित करण्यात येत आहे.

त्या पुढील ०४ कि.मी. परिसरातील लिंचोडी, धामणगांव, सुर्डी, कारखेल बु., डोईठाण, वाची, लाटेवाडी व महाजनवाडी हि गांवे बफर झोन (Buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहेत.हि सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close