महाराष्ट्र

सार्वजनिक गणेश मंडळांना  सवलतीच्या दराने  वीज 

सुरक्षितता बाळगून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

औरंगाबाद –  सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. तसचे मंडळांनी उत्सवातील देखावे , मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात. असे आवाहन महावितरणने केले आहे.

        गणेशोत्सव दि. ३१ आॅगष्ट २०२२  ते 0९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत मोठया प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणचा घरगुती वीज वापराचा प्रति युनिट दर 3 रूपये ३६ पैसे आहे.  महावितरणकडून  गणेत्सव मंडळांना केवळ 3 रूपये ३६ पैसे प्रति युनिट दराने वीज पुरवठा देण्यात येणार आहे. तसेच अनामत रक्कम ही एक किलो वॅट पर्यंत जोडभारासाठी रू. 2,000/— तसेच एक किलो वॅट पेक्षा जास्त जोडभारासाठी रू. 1,000/— प्रति किलो वॅट असा दर ठेवण्यात आलेला आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी   अनधिकृत    वीज जोडणी न घेता घरगुती किंवा अन्य मार्गाने अनाधिकृत  वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळासमोर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

    सार्वजनिक गणोशोत्सव व नवरात्र उत्सवासाठी मंडप, देखावे, रोषणाईसाठी लागणारी वीज यंत्रणाही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करून घ्यावी. व आर्थिगचीही खबरदारी  घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीज भारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व मंडपासाठी काही ठिकाणी टिनपत्रे यांचा वापर  होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले व टेपने जोडलेले असल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासह प्राणांतिक अपघाताची मोठी शक्यता असते.

     विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीज पुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते. आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो  भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षा बाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

   महावितरणची २४ तास सेवा 

    मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता महावितरणच्या २४ बाय ७ तास सुरू असलेल्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १९१२  / १९१२० /  १८००२३३३४३५  /  १८००१०२३४३५  या कॉल सेंटरवर संपर्क साधावा. तसेच  अनधिकृत     वीज जोडणी घेणा—या  गणेश मंडळांविरूध्द म.रा.वि.वि.कं.च्या नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ  मंगेश गोंदावले   यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button