आपला जिल्हा

बीड @9 : मुंबईकरांनी सुनेच्या माहेरी दिला कोरोनाचा वानवळा

बीडआष्टी तालुक्यातील सांगवी पठाण याठिकाणी सुनेच्या माहेरी मुंबईहून सुरक्षित जागा म्हणून आलेल्या सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्यामुळे बीडची कोरोना बाधितांची संख्या नऊवर पोहोचली आहे. आज 29 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते पैकी 22 अहवाल आले आहेत
नगर जिल्ह्यातील पिंपळगाव खुडा या गावचे मूळ रहिवासी असलेले परंतु मुंबई येथे स्थायिक झालेले कुटुंब 13 तारखेला सांगवी पठाण येथे आले. सांगवी पठाण हे गाव त्यांच्या सुनाचे असून बीड जिल्हा सुरक्षेत असल्यामुळे त्यांनी या गावी येण्यासाठी पास मिळवला. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर ते शेत वस्तीवर क़रंटाईन होते. त्यांच्यात कोरोना ची लक्षणे दिसू लागताच स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. आज पाठवण्यात आलेले एकूण 29 अहवाल यापैकी 22 अहवाल निगेटिव आले. मात्र सात अहवाल येण्यास उशीर झाला त्यावेळीच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली होती. अखेर ही शंका खरी ठरली. आष्टीत यापूर्वी एक कोरोना रुग्ण सापडला होता मात्र त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात आले होते. पुन्हा एकदा सात रुग्णांची भर पडल्यामुळे बिडची एकूण रुग्ण संख्या नऊ झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close