बीड — संपन्नतेचा वारसा लाभलेल्या बीडच्या पत्रकारितेला सध्या अनैतिकतेचं ग्रहण लागल आहे. आपल्या अर्धांगिनीच्या चारित्र्याची आहुती ‘बंबा’ खाली घालून त्यातून गरम झालेल्या पाण्यात अंघोळ करत समाजाला चारित्र्यसंपन्नतेचं भागवत सांगितलं जात आहे. हे सांगताना आया बहिणींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत समाज सुधारणेचा आव आणत स्वयंघोषित लोक पत्रकाराला
आपलीच खरकटी ती नीट बघ रे, तत्वज्ञानाचे डोस पाजण्यासाठी कुठपर्यंत हाणणार तावऽऽरे असं म्हणण्याची वेळ आली आहे. या सर्व घटनांमध्ये मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवरच्या
विश्वासाची लोकां ची आशा भंग पावू लागली आहे.
” बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” असं संतांनी म्हटल आहे.पण त्याच संतांचं नाव घेत बाजार बुनगे लोकशिक्षण, प्रबोधन याच्या नावाखाली लेखणी प्रपंच करू लागले आहेत.जातीय तेढ निर्माण करणे, विशिष्ट जाती धर्माला दूषण देणं,जीवाची पर्वा न करता महामारीच्या संकट काळात अहोरात्र रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिका भगिनींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी अश्लीलता पसरवली जात आहे. याच विवेचन करणं,चारित्र्याच्या संशयाच भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसवताना कौटुंबिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत समाजाला चारित्र्य संपन्नतेचा डोस पाजण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. सोबतच अंधभक्त निर्माण करून मीच कसा खरा हे ठासून सांगत लोकांच्या गळी उतरवण्याचं काम केलं जात आहे. पण या (त्यांच्या दृष्टीने) तळपत्या लेखणीचे ओरखडे पत्रकारितेच्या नावाखाली समाजमनावर मारले जात आहेत.पण या लेखणीतली शाईच अनैतिकतेची असेल तर समाज मान्यता मिळणार कशी असा थोडासा प्रश्न देखील स्वयंघोषित लोक पत्रकाराला कधीच पडला नाही. ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेचा इतिहास पाहता महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक लेखणी बहाद्दरांनी आपली सेवा दिली. पण हे बोरु बहाद्दर कधीच एक वर्षापेक्षा जास्त काळ संस्थेतल्या खुर्चीवर टिकून राहू शकले नाहीत. कारण त्यांना नैतिकतेची चाड होती.मात्र सध्या वादंगाचा मोहोळ जमवून देखील हीच व्यक्ती खुर्चीवर इतक्या वर्षापासून टिकून कशी? मग बाकीचे खुर्चीवर का टिकले नाहीत? असा प्रश्नही अनेकांना पडत राहतो. याचं आश्चर्यही वाटत? पण हीच खुर्ची टिकवण्यासाठी व आपल्या लेखणीची समशेर तळपती ठेवण्यासाठी नको त्या अनैतिक गोष्टीचा आधार या व्यक्तीला घ्यावा लागत आहे. पण वाचकांचे व अंध भक्तांचे डोळे उघडावे त्यासाठी हा दुर्दैवी लेखनी प्रपंच करावा लागतो आहे. लोकशाहीत कसं वागावं याच स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण स्वतःच अनैतिकतेचा बाजार भरवून दुसऱ्यांना नैतिकतेचा चारित्र्याचा डोस पाजू नये एवढेच आमचं म्हणणं आहे.
आपल्या अर्धांगिनीच्या चारित्र्याची आहुती ‘बंबा’ खाली घालून त्यातून गरम झालेल्या पाण्यात अंघोळ करत समाजाला चारित्र्यसंपन्नतेचं भागवत सांगितलं जात आहे. शिवाय संत महंतांच्या नावाचा दाखला देत नैतिकतेचा डोस जनतेच्या माथी मारल्या जात आहे याचच दुःख वाटतं.लेखन प्रपंचात पातळी सोडू नये हे तत्व अंगीकारत प्रत्येकाने नैतिक बंधन पाळली प्रत्येकाने बुज राखली याचा विपर्यास करत कोणाला काही लिहिताच येत नाही कोणाची हिंमत नाही. कोणाला काही माहीतच नाही असा अविर्भाव आणत कुठपर्यंत असाच हाणणार तावऽऽ रे असं म्हणण्याची वेळ आली आहे.पत्रकारितेतल्या तत्वांची इज्जत राखली तर आमचं म्हणणं काहीच नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही म्हण विसरलेल्या व्यक्तीच्या
पापाचा घडा शेवटी भरणारच आणि ते फेडावं लागणारच? पण नालीत उतरलंच नाही,तर ती साफ होणार कशी ? असं म्हणत आम्हीच ती नाली साफ करण्याची हिम्मत दाखवली आहे.