आपला जिल्हा

ईटकुर व हिवरा येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे सात किलोमीटर परिसर कंटेनमेंट व बफर झोन म्हणून घोषित

बीडगेवराई तालुक्यातील ईटकुर व माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गावांच्या तीन किलोमीटर परिसरातील गाव कंटेनमेंट झोन म्हणून तर उर्वरित चार किलोमीटर परिसरातील गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत

जिल्हयात सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, इत्यादी बाधित भागातुन प्रवासी येत आहेत.

त्यामध्येे ईटकुर ता.गेवराई येथे मुंबईहुन दिनांक १०मे २०२० रोजी एक कुटुंब आले व आल्याबरोबर त्यांना दिनांक १० मे २०२० पासुन होम क्वारंटाईन करण्यात आले त्यानंतर दिनांक १३ मे २०२० रोजी आयसोलेशन वार्ड, जिल्हा रुग्णालय,बीड येथे दाखल करण्यात आले सदरील १२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाचे आई, वडिल यांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आढळुन आले.

हिवरा ता.माजलगाव येथे २ व्यक्ती (पती-पत्नी) हे दिनांक ०७ मे २०२० रोजी मुंबईहुन आले व त्यांना त्याच दिवशी जिल्हा परिषद हिवरा शाळा येथे क्वारंटाईन करण्यात आले त्यानंतर लक्षणे आढळुन आल्यावर संबंधितांना दिनांक १४ मे २०२० रोजी आयसोलेशन वार्ड, जिल्हा रुग्णालय,बीड येथे दाखल करण्यात आले. संबंधित
पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब नमुना हा निगेटिव्ह आढळुन आला आहे .सध्या हे दोनही रुग्ण आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय, बीड येथे दाखल असुन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत.

तसेच त्याचे सर्व निकट सहवासीत (High Risk Contact), इतर सहवासित (Low Risk Contact) या शोध घेवुन त्यांना आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल करून त्यांचे थ्रोट स्वब नमुने तपासणीस घेण्याची कार्यवाही चालु आहे.या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना चालु करण्यात आल्या आहेत.

ईटकुर ता.गेवराई येथे १ रुग्ण कोबिड – १९ पॉझिटिव्ह आढळून आला असुन गावाच्या परिसरातील ३ किलोमिटर परिसरामध्ये ईटकुर, हिरापुर, शिंपेगाव, कुंभारवाडी ता.गेवराई, खामगाव, नांदुरहवेली, पारगाव जप्ती ता बीड मध्ये येत असुन त्याठिकाणी कॉन्टेनमेंट झोन जाहिर करण्यात आला असुन एकुण १४ टिम द्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.यामध्ये एकुण ८४० घरे व ४७४० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तर लोळदगाव, अंकोटा, शहाजानपुर चकला, मादळमोही, कृष्णनगर, पाडळसिंगी, टाकळगाव ता.गेवराई, आहेरचिंचोली, कामखेडा, पेंडगाव, हिंगणीहवेली, पारगावशिरस हि गावे ७ किलोमिटर परिसरात येत असुन त्याठिकाणी बफर झोन जाहिर करण्यात आला आहे.

हिवरा ता.माजलगाव येथे १ रुग्ण कोबिङ -१९ पॉझिटिव्ह आढळुन आला असुन गावाच्या
परिसरातील ३ किलोमिटर परिसरामध्ये हिवरा बु., गव्हाणथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, भगवाननगर ता.माजलगाव मध्ये येत असुन त्याठिकाणी कॉन्टेनमेंट झोन जाहिर करण्यात आला असुन ७ टिम द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे .यामध्ये एकुण ८१८ घरे व ३३९७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. तर राजेगाव, सुर्डी नजीक, महातपुरी, वा धोरा, वाघोरातांडा, हि गावे ७ किलोमिटर परिसरात
येत असुन त्याठिकाणी बफर झोन जाहिर करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close