आपला जिल्हा

” सह्याद्री माझा ” ची भीती अखेर खरी ठरली : रेखावार साहेब यशाच्या अहंपणातून निर्माण झालेला बौद्धिक स्तर अखेर उघडा पडला

बीडरेखावार साहेब तुमच्या दृष्टीने ऊसतोड कामगार शुद्र म्हणून तो गावकुसाबाहेर तर रेड झोन मधून चोरट्या मार्गाने आलेल्या लोकांना पायघड्या असं वृत्त काल “सह्याद्री माझा “ने”प्रसिद्ध केलं होतं. या बातमीतून प्रशासनाला घडत असलेल्या घटनेबाबत जागरूक करण्याचा उद्देश होता मात्र सुरुवातीपासूनच एकही पेशंट न सापडल्याचा आपण फार नियोजनबद्ध काम केला असल्याचा अहम गंड जिल्हाधिकाऱ्यांना निर्माण झाला व त्यांनी ही बातमी म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टिप्पणी केली. अन नको होतं तेच आज घडलं दोन पेशंट सापडले आणि जिल्हा हादरला.

ऊस तोड कामगार परदेशातून आलेल्या विस्थापित लोकांसारखी त्यांना वागणूक दिली गेली ‌ त्यांना माळरानावर ठेवण्यात आलं या ठिकाणी त्यांची उपासमार मोठ्या प्रमाणात झाली ऊन वारा पाऊस झेलत या मजुरांनी आलेली वेळ कशीबशी पार पाडली. त्याच वेळी चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या लोकांना मात्र होम कोरंटाईन करत त्यांना गावात घेतलं मग ऊस तोड कामगार माणूस नव्हता काय? शासनाच्या नियमाला जिल्हा बंदीला फाट्यावर मारत कायद्याचे तीन-तेरा वाजवणाऱ्या लोकांना मात्र सन्मानाची वागणूक दिली गेली व ऊसतोड कामगारांना च्या बाबतीत मात्र सापत्न पानाची दृष्टी जिल्हाधिकार्‍यांनी ठेवली अशा आशयाची ही बातमी केली गेली होती. काल हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टिपणी. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण न सापडल्यामुळे या यशाचा माज निर्माण झाल्याच या टिपणीतून निदर्शनास आलं. पण जिल्हाधिकारी साहेब तुम्ही आज न उद्या बीड हुन बदली होऊन जाताल इथली जनता आमचीच आहे इथल्या जनतेच्या आरोग्याची काळजी जशी तुम्हाला आहे तशीच आम्हाला देखील आहे तुमच्यापेक्षा जास्त आहे .पण अधिकाराची हवा डोक्यात शिरली की माणूस तारतम्य ज्ञान विसरतो कोण काय म्हणतो याकडे दुर्लक्ष करतो मीच शहाणा या आविर्भावात तो वागायला सुरुवात करतो. आता काहीच होणार नाही या अहम गंडातूनच बाहेरून आलेल्या दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. काहीही असो आम्ही प्रशासनाला संचेत करण्याचा प्रयत्न केला व दुर्दैवाने आमची भीती आज खरी ठरली. किमान आता तरी सुधरा माध्यम काय म्हणतात याकडे बारकाईने लक्ष द्या त्रुटी दूर करायचा प्रयत्न करा. तुच्छतेची भावना सोडा तरच बीडकरांचे आरोग्य सुरक्षित राहील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close