पुणे — पुत्र प्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. तसेच फिर्यादी महिलेला वेळोवेळी मारहाण करून तिच्याकडून 1 ते 2 कोटीची रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली. तर याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर ज्या मांत्रिकाने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली त्याच्यावरही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने पतीसह सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये फिर्यादीचा पती, सासरा आणि सासूने अत्याचार केले आहेत. या तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सासरच्यांकडून वेळोवेळी फिर्यादीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करून 75 लाखांचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पुजा केली. त्यावेळी तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मांत्रिकाला अद्यापही अटक करण्यात आली नाही.