आपला जिल्हा

बीडमध्ये देखील कोरोणाचे दोन रुग्ण सापडले, जिल्हा हादरला

बीडमुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे.

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ होता. तसेच त्याच्यावर नगरमध्येच उपचार सुरु होते आता मात्र गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळूनआला आहे. गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close