महाराष्ट्र

शिंदे ठाकरे संघर्षाची सुप्रीम सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई — शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर 22 ऑगस्ट ला सुनावणी होणार होती मात्र ती आता लांबणीवर पडली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाचा निकाल 22 ऑगस्ट ला लागणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. मात्र आता नागरिकांना निकालाची पुन्हा एक दिवस वाट पहावी लागणार आहे.त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.सुप्रीम कोर्टाच्या यादीनुसार, 23 ऑगस्ट रोजी सुनावणीची शक्यता असे लिहण्यात आले आहे.त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची यावरील उत्तर ऐकण्यासाठी नागरिकांनी आणखी एक दिवसाचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार नाही.शिवसेना कुणाची? याबाबत शिंदे गट आणि शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.यापूर्वीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सुतोवाच केले होते. खरी शिवसेना कोणाची? प्रकरण घटनापीठाकडे जाणार की निकाल देणार? बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय यावर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे सरकारने विधिमंडळात सादर केलेला बहुमताचा प्रस्ताव व त्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला शिवसेनेने आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत नियोजित वेळापत्रकानुसार 22 ऑगस्ट रोजीच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी आणखी मोठ्या घटनापीठाकडे द्यायची की नाही, हे ठरवायचे आहे. त्यामुळे सुनावणीस विलंब होत असल्याचेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button