आरोग्य व शिक्षण

अहमदाबादमध्ये डॉक्टरांचे PPE कीटसाठी आंदोलन

अहमदाबाददेशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट व एन ९५ मास्क मिळण्यात अडचणी येत आहेत. मोदींच्या गुजरातमध्ये या वस्तूंसाठी डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे

                          कोरोना चा प्रकोप वाढत असून डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना मुबलक प्रमाणात पीपीइ किट देण्यात राज्य सरकार कमी पडत आहे परिणामी डॉक्टरांपूढे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गुजरात मॉडेलचा बोलबाला देशात झालेला आहे.

याबाबत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट टाकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील अनेक डॉक्टर व नर्सेस सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन करत आहेत. मागणी आहे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट व एन ९५ मास्क मिळण्याची. शेठ तर म्हणाले होते की देशात दिवसाला २ लाख पीपीई व मास्क तयार होतात. मग जातात कुठे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा गुजरात अशीच या राज्याची ओळख आहे. तिथेच ही परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close