आरोग्य व शिक्षण

आधार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

रायगड — भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “आधार सामाजिक सेवाभावी संस्था”व सिटिझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने आधार संस्थेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी ताई धोत्रे व सिटिझन हायस्कूल च्या प्रिन्सिपॉल सरवत पेणकर त्यांच्या सहकाऱ्यांनी उरणमधील सिटिझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आजचा दिवस साजरा केला.

शाळेच्या प्रिन्सिपॉल सरवत पेणकर व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ अश्विनी धोत्रे, , अर्चना तळेकर, अर्चना चोरगे ,वृषाली पवार, स्वाती धोत्रे, सायली वेळासकर, रेखा लहासे, क्रांती पाटील, रश्मी पाटील, रोशनी साळवी, नयना धोत्रे, व पत्रकार तृप्ती भोईर आदी उपस्थित होते.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button