आरोग्य व शिक्षण

केज तालुक्यातील आठ गाव बफर झोन घोषित, संचारबंदी लागू

बीडउस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कोरोना चे तीन रुग्ण आढळून आले असून कळंब शहराच्या तीन कि.मी परिसरात बीड जिल्ह्यातील एकही गाव येत नसले तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून केज तालुक्यातील सात गाव बफर झोन म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहेत.या गावांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याच्या सीमेवर कळंब तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शेजारी असलेल्या ब केज तालुक्यात असलेल्या काही गावांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केज तालुक्यातील सोनेसांगवी, मांगवडगाव, माळेगाव, लाखा, भोपळा, हादगाव ,सुरडी ,बोरगाव या हि गाव बफर झोन जाहीर केले आहेत. बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केज तालुक्यातील सात गावे आजपासून सात किलोमीटर परिसरात अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू केली आली आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close