ताज्या घडामोडी

गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी डॉ.ज्योती मेटे यांना आमदार करावे- छञपती संभाजीराजे

छत्रपती संभाजी राजे यांच्या कडून स्व. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट

बीड — छत्रपती संभाजी राजे यांनी आज लोकनेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या बीड येथिल निवासस्थानी भेट घेवुन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष व संघटनेला बळ मिळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी डॉ. ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाले पाहिजे. तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावे अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना विनायकराव मेटे यांच्या गाडीला अपघात होवून त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले एक प्रकारे ते समाजाच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि समाज प्रश्नांवर शहीद झाले अशी भावना आता समजा बांधावा मध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने मेटे कुटुंबीय सह शिवसंग्राम आणि मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो या करिता आज छत्रपती संभाजी राजे यांनी मेटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतील आणि भविष्यात आपल्याला कसलीही मदत लागली तर मी मेटे कुटुंबीया सोबत उभा असेल असे त्यांनी डॉ. ज्योती मेटे , रामहरी मेटे, मुलगा अशितोश मेटे यांना या वेळी सांगितले आणि त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.

SHARE

Related Articles

One Comment

  1. महाराष्ट्र विधानसभा स्थापनेपासून मराठ्यांचे दीडशे आमदार कायम विधिमंडळात आहेत म्हणावं राजेंना! आजपर्यंत भलं झालं नाही तिथं यांना आमदार केल्याने होईल का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button