आपला जिल्हा

रेखावार साहेब तुमच्या दृष्टीने ऊस तोड कामगार शूद्र म्हणून तो गावकुसाबाहेर, रेड झोन मधून चोरट्या मार्गाने येणारांना मात्र पायघड्या.

बीडपोटाची खळगी भरण्यासाठी शेतात ऊस तोडणी करणारा ऊसतोड कामगार जिल्ह्यात येत असताना त्यांना मात्र गावकुसाबाहेर किंवा शाळेत सोय करण्याचे निर्देश दिले. आता रेड झोन, कंटेनमेंट झोन मधून चोरट्या मार्गाने आलेल्या व्यक्तीला मात्र होम कोरंटाईन होण्याचा सल्ला दिला जातोय कारण तो शहरात जाऊन सुख विलासी जीवन जगलाय म्हणून त्याला व ऊसतोड कामगारांना वेगळा न्याय असं का?
बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड मजूर जिल्ह्यात येत असताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश देत मजुरांनी गावाबाहेर किंवा शाळेत कोरंटाईन करण्याचा घाट घातला. लॉक डाऊन नंतर त्यांच्या नशिबी वनवासच आला. मात्र रेड झोन, कंटेनमेंट झोन मधून चोरट्या मार्गाचा वापर करतात जिल्ह्यात दाखल होत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मंडळी शहरातील कामगार वर्ग आहे काही प्रमाणात का होईना सुख विलासी जीवन जगलेले आहेत. त्यांच्यावर मात्र प्रशासनाची मेहरबानी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशा लोकांवर
कुठलीच कारवाई होतांना दिसून येत नाही.

तर मी काय करू ?
रेड झोन मधून लोक आले आहे त्यांची सोय आम्ही तरी कुठे करायची. शाळा ही भरवस्तीत आहे.मग राहू द्या त्यांना त्यांच्या घरी त्यांनी तरी शेतात कुठं राहायचं तुमच्या घरचा माणूस असता तर तुम्ही काय केलं असतं ? ऊसतोड कामगारांना शेतात राहायची सवय असते म्हणून आम्ही त्यांना शेतात ठेवलं होतं पण आता नवीन आलेले लोक गावात राहिले तरी आमचा नाविलाज आहे.
पी.जे. तेलप , ग्रामसेवक हिंगणी बुद्रुक तालुका जिल्हा बीड.

बिनधास्तपणे ही मंडळी ग्रामीण भागात येऊन गावात राहत आहेत. स्थापन केलेली दक्षता समिती नुसतीच अत्यावश्यक सेवेच्या पासचा लाभ मिळावा एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. सरपंचाचा मतावर डोळा आहे तर ग्रामसेवक गावाकडे फिरकायला देखील तयार नसल्याचे पाहावयास मिळत आहे. नवीन आलेल्या व्यक्तीची माहिती पोलिसांना द्यावी तर तेसुद्धा याकडे गंभीरतेने पाहायला तयार नाहीत. थोडक्यात सांगायचे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दृष्टीने ऊसतोड कामगार शूद्रच ठरवला गेला आणि चोरट्या मार्गाने आलेल्या लोकांना कारवाई होत नसल्यामुळे पायघड्या घालण्याचा प्रकार नाही काय असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. गावागावात ही नात्यागोत्यामूळे गट तट निर्माण होत वादविवाद सुरू झाले आहेत. अनेक गावच्या शाळा भरवस्तीत असल्यामुळे त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. ही मंडळी शाळेत अथवा शेतात उघड्यावर राहायला तयार नाहीत. निवार्‍याची सोय उपलब्ध नाही व यांची सोय लावायची कशी असे प्रश्न सुद्धा भेडसावू लागले आहेत
एकंदरच गाव व गावातील नागरिक वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जवळपास दोन महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन ग्रामीण भागात केले गेले ते सर्व आता मातीत जाण्याची वेळ आली आहे. जर रेड झोन,कंटेनमेंट झोन मधून आलेल्या लोकांचे प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना देणेघेणे नाही तर ग्रामीण भागाला आतापर्यंत नियमांची सक्ती का केली? असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close