ताज्या घडामोडी

इंदुरीकर महाराजांचे किर्तन रद्द; ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव

बीड — आपल्या खूमासदार शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नेकनूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्याची घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण – निवृत्ती महाराज इंदुरीकर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मागणी असते. याप्रमाणेच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन कळसंबर गाव येथे ठेवण्यात आले होते. मात्र, इंदूरीकर महाराज यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला.यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आणि गावकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. गावकऱ्यांनी सांगितले की, इंदूरीकर महाराजांच्या किर्तनासाठी तब्बल एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, त्यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी नेकनूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

किर्तनाचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे कळसंबर गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यातील एका गावकऱ्याने सांगितले की, इंदूरकीर महाराज यांनी आजच्या कीर्तनासाठी आम्हाला शब्द दिला होता. त्यामुळे आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी सुमारे सव्वालाख रुपये खर्चून कीर्तनाची पूर्ण तयारी केली.

मात्र, अचानक इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन रद्द केल्याचा निरोप आम्हाला आला. हे योग्य नाही. आम्ही पैसे गोळा करून हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, आजच्याच दिवशी त्यांनी इतर ठिकाणी कुठे कीर्तन ठेवले तर मात्र आम्ही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत, असे एका संतप्त गावकऱ्याने सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button