क्राईम

तिहेरी हत्याकांडातील आरोपींना २१ मे पर्यंत पोलीस कोठडी

बीडकेेज तालुक्यातील मांगवडगाव येथील जमिनीच्या वादातून पारधी समाजातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींच्या खून प्रकरणातील बारा आरोपीना सत्र न्यायालयाने २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाबू शंकर पवार (वय-६०),प्रकाश बाबू पवार (वय-४५) संजय बाबू पवार (वय-४०) या तिघांचा खून करण्यात आला होता. 
या प्रकरणी धनराज पवार यांच्या फिर्यादीवरून सचिन मोहन निंबाळकर ,हनंमुत मोहन निंबाळकर ,राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर, प्रभु बाबुराव निंबाळकर, बालासाहेब बाबुराव निंबाळकर , राजाभाऊ हरीचंद्र निंबाळकर, अशोक अरूण शेंडगे , कुणाल राजाभाऊ निंबाळकर ,शिवाजी बबन निंबाळकर , बबन दगडू निंबाळकर ,जयराम तुकाराम निंबाळकर, संतोष सुधाकर गव्हाणे (सर्व रा. मांगवडगाव ता.केज) या बारा आरोपी विरोधात गु. र. नं. १०६/२०२० भा.दं. वि. १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, १२०(ब), ४३५, ४२७ सह ४,२५ मोटार वाहन कायदा कलम शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम १८४ आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक काय दा कलम ३(१) (जी) ३(२) (व्ही) (ए) ४(२) (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आज या सर्व आरोपीना सत्र न्यायालय अंबाजोगाई न्यायालयाने दि. २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close