कृषी व व्यापार

ग्रामीण भागातील उद्योगांना हातभार लावून बँकेची प्रगती करा — ह.भ.प. रंगनाथ महाराज

गेवराई — खंडेश्वर महिला ग्रामीण बिगर शेती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मालेगाव बू ता. गेवराई शाखेने बांधालिकी जोपासून लहान-मोठ्या उद्योग समूहाला हातभार लावून, अशा सर्व घटकांचा आशीर्वाद घ्यावा, असे प्रतिपादन हभप रंगनाथ महाराज यांनी येथे बोलताना केले आहे.

सोमवार ता.15 ऑगस्ट रोजी गेवराई तालुक्यातील खंडेश्वर महिला ग्रामीण बिगर शेती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मालेगाव बू येथील मुख्य शाखेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान,
या बॅन्केची उत्तरोत्तर प्रगती होत राहील, अशी सदिच्छा पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावर माजी मंत्री बदामराव पंडित, बापूराव चव्हाण, डॉ.विजयकुमार घाडगे, समाजसेवक सुभाष काळे , माधव चाटे ,किरण आहेर, पत्रकार विनोद नरसाळे, शिवाजी गंगाधर, नवनाथ पारे , संभाजी दूधसागर, बापूराव गंगाधर, शामराव चेके, महेश अरबड, माऊली गंगाधर , गणेश चव्हाण, कुटे ग्रुप चे शिंदे साहेब, माऊली जाधव, कृष्णा शहाणे, ज्ञानेश्वर बरबडे, जेष्ठ पत्रकार अयुब बागवान, पत्रकार भागवत जाधव, डॉ. लेंडगुळे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव महेश चेके,चेरअमन दिलिप हाके, व्हा. चेरअमन वसंत पवार , संचालक सुनिल हाके, अतुल ढोले, सोमनाथ विखे, अशोक बनगर, अक्षय बने, संदिप जाधव, बाळासाहेब लेंडगुळे, किसन महारनोर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव महेश चेके यांनी केले. बँकेचे ध्येय धोरणे, योजना व सामजिक बांधलकी जपत सर्व खातेदारांना मोफत अपघाती विमा देण्याचा मानस असल्याचे सचिव महेश चेके यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन प्रा. माधव चाटे सर यांनी केले. व आभार व्हा. चेरअमन वसंत पवार यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button