क्राईम

गर्भपात प्रकरणाचे सभागृहात पडसाद: आ. लक्ष्मण पवार आक्रमक ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

गेवराई — बीड तालुक्यात घडलेल्या बक्करवाडी येथील अवैध गर्भपात प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ सभागृहात गुरूवार ता.18 रोजी उमटले असून, विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांनी आमदार पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केली आहे.

गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी आक्रमकपणे सदरील विषय सभागृहात मांडला आहे. सदरील प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवावे. आणखी तपास करावा, अशी मागणी ही आ. पवार यांनी केली. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याप्रकरणाचा पून्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जाईल अशी घोषणा ही केली.
बीड तालुक्यातल्या बक्करवाडीमध्ये शितल गाडे या 30 वर्षीय महिलेचा गोठ्यामध्ये गर्भपात करताना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता. या प्रकरणात काही जणांना अटक करून त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी विधीमंडळामध्ये गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी महाराष्ट्र सरकारचे लक्ष बीड जिल्ह्यातल्या अवैध गर्भपात आणि लिंगनिदान विषयाकडे वेधले. ज्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला असून, ज्या डॉक्टराने हा गर्भपात केला त्याचे नाव समोर आले नाही. त्याचबरोबर सरकारला तीन प्रश्‍न विचारत हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामार्फत चालवावे, अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणाचा पून्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जाईल अशी घोषणा केली. लक्ष्मण पवारांनी महत्वपूर्ण प्रश्‍नाला हात घातला असून आरोग्य मंत्र्यांनी दखल घेतली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button