आपला जिल्हा

तिहेरी हत्याकांडातील पीडितांची धनंजय मुंडे उद्या शुकवारी भेट घेणार

परळी केज तालुक्यातील मांगवडगाव येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडातील पीडितांची पालकमंत्री धनंजय मुंडे शुक्रवार दि. 15 मे रोजी भेट घेणार आहेत. 

केज तालुक्यातील मांगवडगाव येथील एका कुटुंबियांवर गुरुवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या घटनेची दखल घेतली असून ते शुक्रवारी (दि.१५) रोजी दुपारी १२ वा. घटनास्थळी भेट देऊन पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close