आपला जिल्हा

अवकाळी पावसाने  पिकांचे,घरांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या आ. संदीप क्षीरसागरांच्या  महसूल प्रशासनास सूचना

बीडबुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणात ,राहत्या घराची पडझड होऊन नुकसान झाले आहे,शेतकऱ्यांच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.विजेचे पोल जमीनदोस्त झाले असून याची राजुरी नवगण परिसरात पाहणी करून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावते असे आदेश महसूल प्रशासनास दिले आहेत.

बीड तालुक्यातील अनेक ठिकाणी काल झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा व टरबूज, खरबूज आणि घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजुरी नवगण परिसरात जाऊन आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश बीड ,शिरूर तहसीलदार यांना दिले आहेत. या नुकसानीची माहिती तात्काळ तलाठी, ग्रामसेवक सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयास द्यावी ही असेही सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close