नवी दिल्ली — केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना मोठा झटका बसला आहे. शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्कारांसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचा तपास 3 महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठात पीडित महिलेने काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व वस्तुस्थिती पाहून स्पष्ट केले की, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांची पूर्ण अनिच्छा आहे. पोलिसांनी ट्रायल कोर्टात सादर केलेला अहवाल हा अंतिम नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.जानेवारी 2018 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. छतरपूर फार्म हाऊसमध्ये शाहनवाज हुसैनने महिलेवर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता.यापूर्वी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अहवाल सादर करत सांगितले होते की, शाहनवाज हुसेन विरुद्धचा खटला दाखल करून शकत नाही. मात्र ट्रायल कोर्टाने आपल्या निर्णयात पोलिसांचा युक्तिवाद फेटाळला होता, आणि कोर्टाने म्हटले होते की, महिलेच्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा आहे. शाहनवाज हुसैन हे बिहारचे आमदार आहेत. बिहारमधील जेडीयू-भाजप युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. शाहनवाज हुसैन हे देखील तीन वेळा खासदार राहिले आहेत. ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही होते.