क्राईम

तिहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला, जमिनीच्या वादातून मध्यरात्री घडला थरार

इक्बाल शेख

केजतालुक्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणामध्ये सतरा जणांना ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

निंबाळकर पवार यांचा गेल्या २० वर्षापासून जमिनीचा वाद कोर्टामधे चालू आहे २० वर्षापुर्वी निंबाळकर व पवार यांच्यात भांडण होऊन निंबाळकर कुटुंबियातील एका व्यक्तीची हत्या झाली होती त्यामधे मृत व्यक्तीचे प्रेत पण पोलिसांना सापडू शकले नाही. त्यामधे ३०२ होऊन आज हत्या झालेलेच आरोपी होते नंतर आरोपी पुराव्या अभावी निर्दोष मूक्त झाले होते त्यांनतर ते गाव सोडून निघून गेले व जमिनीच्या कोर्ट कचेरी चालू होत्या. या वादातूनच हे हत्याकांड घडले आहे. बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या तिघांवर हल्ला करुन खून करण्यात आला. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. प्रकरणी गावातीलच निंबाळकर कुटुंबातील बारा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्याकांडापूर्वी पीडित व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटार सायकलसुद्धा जाळून टाकण्यात आल्या. हल्लेखोर हे ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून हल्ला केला. हल्लेखोर तीस ते चाळीसजण असल्याची प्राथमिक आहे.मध्यरात्री ३ च्या सुमारास या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी अप्पर पोलिसअधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस ,केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसफ वडगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंद झोटे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close