राजकीय

काँग्रेसचे दोन तरुण व एक ज्येष्ठ नेता भाजपाच्या वाटेवर –पाटील

मुंबई –. थोरात तुम्ही खडसेंचा काय घेऊन बसलात कोरोना संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये देश व राज्य पातळीवर असंख्य भूकंप होणार आहेत काँग्रेसचे दोन तरुण व एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे हे नेते कोण यावर आता चर्चा सुरू झाली आहे
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची ऑफर दिली होती खडसे साठी भाजपचे सात आमदार वोटिंग करणार होते यात कितपत तथ्य आहे. असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोरोना चे संकट दूर होताच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये असंख्य भूकंप होणार आहे. एकनाथ खडसे च काय घेऊन बसलात देशपातळीवर तीन भूकंप होणार असून दोन तरुण आणि एक जेष्ठ नेते भाजपमध्ये यायला तयार असल्याचा दावा त्यांनी केला. चंद्रकांत पाटील हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. या भूकंपाची कुणकुण बाळासाहेब थोरात यांना असल्याचाही त्यांनी सांगितले आहे त्यांनी सांगितला आहे. खडसे हे आमचे नेते असून हि आग आहे त्यांच्या नादी लागू नका असा चिमटाही त्यांनी यावेळी घेतला. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर हे नेते कोण यावर विचारमंथन केले जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close