महाराष्ट्र

🇮🇳पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार! विरोधकांचा चहापानावर बहिष्कार तर सरकारकडून मोठ्या घोषणा🇮🇳

मुंबई — उद्या होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याची ्झलक पाहायला मिळाली. आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकत. आधीच्या निर्णय़ांना स्थगिती आणि ओल्या दुष्काळावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.दूसरीकडे महाविकास आघाडी सरकारपेक्षा वेगानं निर्णय़ घेत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
   विरोधकांनी मुख्यमंत्री यांना आरोपांची मोठी यादी आज पाठवली. सोबतच ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. हेक्टरी 75 हजार रुपये मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. त्यामुळे ओल्या दुष्काळ्च्या मुद्द्यावरुन अधिवेशनात संघर्ष पेटणार आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख आमदारांची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक होतेय. अधिवेशनाची रणनीती, सभापती निवड यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील प्रमुख आमदार उपस्थित आहेत.
दुसरीकडे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहे. यंदाच्या दहीहंडीत गोविंदांना 10 लाखांचे विमा कवच असणार आहे. 75 वर्षांवरच्या व्यक्तींना एसटी प्रवास मोफत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लता मंगेशकर संगीत अकादमीचं काम पूर्ण होत आलंय. ही संगीत अकादमी 28 सप्टेंबरला सुरू होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 पासून ही वाढ लागू होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button