महाराष्ट्र

सगळी ताकत फडणवीसांकडेच; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई — शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज अखेर खाते वाटप झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती ठेवण्यात आली आहेत.तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबादारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात, माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्य मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.
विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी मंत्रालयाची तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राजसह वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर दादा भुसे यांना बंधारे व खणीकर्म सोपविण्यात आलं आहे. संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलं. तर सुरेश खाडे यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली असून उदय सावंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला व बालविकास खात्याचा भार देण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळाच्या खातेवाटपावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र चित्र पूर्णपणे वेगळ आहे. देवेंद्र फडणवीसांकडे महत्त्वाची खाती देऊन केंद्रीय नेतृत्त्वाकडून त्यांना ताकद दिली आहे.
शिंदे गटात उद्योग मंत्रालय उदय सावंत यांना तर तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंबकल्याण देण्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग देण्यात आला आहे. तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना, रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय सोपविण्यात आलं आहे.सुरेश खाडे यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दरम्यान औरंगाबादचे अतुल सावे यांच्याकडे सहकार मंत्रालयासह इतर मागास कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय देण्यात आलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button