महाराष्ट्र

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी–अनिल देशमुख

  •  मुंबईपोलीस दल करोणा संकटामुळे अहोरात्र काम करत आहे अतिरिक्त कामाचा भर पडत असल्यामुळे तसेच रमजान व ईद सणाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी केंद्राकडे सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली

सध्या कोरोना चे संकट वाढत असल्यामुळे पोलिसांसमोर आव्हानही वाढत आहेत. परिणामी अतिरिक्त कामाचा ताण त्यांना सहन करावा लागत आहे. त्याबरोबरच अनेक पोलीस कोरोना आजाराला बळी पडले आहे. रमजान ईद हा सण जवळ आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या वीस कंपन्यांची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. सध्या राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या बत्तीस कंपन्या तैनात आहेत त्यांच्या मदतीने पोलीस दल काम करत आहे मात्र अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मागणी करण्यात आली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close